Add parallel Print Page Options

पवित्र आत्म्याचे आगमन

पन्रासावाचा [a] दिवस आला, तेव्हा सर्व प्रेषित एका ठिकाणी एकत्र होते. अचानक आकाशातून आवाज ऐकू आला. तो आवाज सोसाट्याने वाहणाऱ्या वाऱ्यासारखा होता. ज्या ठिकाणी ते बसले होते ते घर त्या आवाजाने भरुन गेले. त्यांनी अग्नीच्या ज्वालांसारखे काहीतरी पाहिले. त्या ज्वाला विभक्त होत्या. आणि तेथील प्रत्येक मनुष्यावर एक एक अशा उभ्या राहिल्या. ते सर्व पवित्र आत्म्याने भरुन गेले आणि ते निरनिराळ्या भाषा बोलू लागले. हे करण्यासाठी पवित्र आत्मा त्यांना सामर्थ्य देत होता.

Read full chapter

Footnotes

  1. प्रेषितांचीं कृत्यें 2:1 पन्नासावाचा वल्हाडण सणानंतर पन्नास दिवसांनी येणारा यहूदी सण. गव्हाच्या कापणीचा हंगाम साजरा करतात.