निर्गम 34:29-35
Marathi Bible: Easy-to-Read Version
मोशेचा सतेज चेहरा
29 मग मोशे, पवित्रकरार लिहिलेल्या त्या दोन दगडी पाट्या घेऊन सीनाय पर्वतावरून खाली उतरला; परमेश्वराशी बोलल्यामुळे त्याचा चेहरा तेजाने तळपत होता, परंतु ते त्याला ठाऊक नव्हते. 30 अहरोन व सर्व इस्राएल लोक यांनी मोशेच्या चेहऱ्यावरील तेजस्वी किरणे पाहिली तेव्हा ते त्याच्या जवळ जाण्यास घाबरले; 31 परंतु मोशेने त्यांना बोलावले तेव्हा अहरोन व इस्राएल लोकांचे वडीलजन त्याच्याकडे गेले तेव्हा तो त्यांच्याशी बोलला. 32 त्यानंतर सर्व इस्राएल लोक मोशेकडे आले आणि त्याने त्यांना परमेश्वराने त्याला सीनाय पर्वतावर दिलेल्या आज्ञा दिल्या.
33 लोकांशी आपले बोलणे संपविल्यावर मोशेने आपला चेहरा आच्छादनाने झाकला. 34 जेव्हा कधीही मोशे परमेश्वराबरोबर बोलावयास त्याच्या समोर जाई, तेव्हा तो आपल्या चेहऱ्यावरील आच्छादन काढीत असे; मग तो इस्राएल लोकांकडे येऊन परमेश्वराने दिलेल्या आज्ञा त्यांना सांगत असे. 35 मोशेचा तेजाने तळपणारा चेहरा इस्राएल लोक पाहात तेव्हा तो पुन्हा आपला चेहरा झाकून घेई; आणि तो बोलावयास पुन्हा परमेश्वराकडे जाईपर्यंत आपला चेहरा झाकून ठेवी.
Read full chapter2006 by Bible League International